Mumbai Suicide Case: भाईंदर खाडी मध्ये उडी मारत व्यावसायिकाची कुटुंबियांसमोर आत्महत्या
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भाईंदर खाडीवर (Bhayandar creek) 53 वर्षीय टूर-ट्रॅव्हल व्यावसायिकाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. भाईंदर मध्ये बनवण्यात आलेल्या नव्या वर्सोवा लिंक (Versova bridge) वर बुधवार संध्याकाळी हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे. पहिल्यांदा या व्यक्तीने वांद्रेवरळी सी लिंक वर आत्महत्येचा प्रयत्न केला पण तेथे सुरक्षा रक्षकाने बाईक रोखली आणि पुढे जाण्यास मज्जाव केला. अजूनही या व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना मिळू शकलेला नाही. त्याचा ठाव लागत नाही.

Atul Dhandhia असं या व्यावसायिकाचे नाव असून तो मिरारोड मध्येच मागील 30 वर्ष टूर आणि ट्रॅव्हल कंपनी चालवत होता. त्याने मुलीला आणि पत्नीला आपण आत्महत्या करत असल्याचं फोनवर कळवलं होतं असे पोलिसांनी सांगितलं आहे. ही आत्महत्या वर्सोवा ब्रीजवर त्यांच्यासमोरच झालेली आहे. दरम्यान कुटुंबियांनीही पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.

Dhandhia हा पत्नी आणि मुलगा, मुलगी सोबत राहत होता. पोलिस अधिकार्‍यांनी Midday सोबत बोलताना, 'Dhandhia हे निराश झाले होते. नैराश्यातच त्यांनी कुणाला न सांगता घर सोडले. नंतर मुलीला आणि पत्नीला मानसिकतेबद्दल आणि आत्महत्येबद्दल सांगितलं. नंतर कुटुंबाने वांद्रे वरळी सी लिंक वर आत्महत्या रोखण्यासाठी मदत मागितली. पोलिस कंट्रोल रूम मध्ये ही माहिती मिळताच त्यांनी रिक्षा पकडून Dhandhia यांचा शोध सुरू केला. दरम्यान वांद्रे वरळी सी लिंक वर पोलिसांनी दुचाकीला प्रवेश निषिद्ध असल्याचं सांगत आपण यू टर्न घेत मीरा रोड कडे जात असल्याचेही कळवलं.' अशी माहिती दिली आहे.

Dhandhia यांचे कुटुंब देखील वेस्टर्न एक्सप्रेस वे वरून माघारी फिरले. यादरम्यान पोलिस देखील त्यांचे लोकेशन ट्रेस करत होते. त्यांना ते नव्याने बांधलेल्या वर्सोवा ब्रीजवर असल्याचं लक्षात आले. पोलिसांनी ही माहिती त्यांच्या पत्नी आणि मुलीला दिली आणि त्यांना ब्रीजवर जाऊन त्यांना वाचवण्याच्या सूचना दिल्या. Suicide Case: आई, वडील, बहिणी समोर 16 वर्षीय मुलाची 5व्या मजल्यावरून आत्महत्या .

पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंब वर्सोवा वर पोहचले, त्यांनी आत्महत्या करू नका म्हणून विनवणी केली. ज्या समस्या आहेत त्या बसून सोडवल्या जातील असं सांगितलं पण त्यांनी बाईक एका बाजूला लावत आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसही तेथे पोहचले पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. नंतर स्थानिक डायव्हर्स आणि मच्छिमारांची त्यांनी मदत घेतली पण गुरूवार पर्यंतही ते मृतदेह मिळवू शकलेले नाहीत.