Mumbai Rains: कल्याण डोंबिवलीसह अनेक उपनगरीय भागात जोरदार पाऊस; Watch Videos
Mumbai Rains (Photo Credits: Twitter)

मुंबईतील काही उपनगरीय भागात पावसाने मंगळवारी (8 ऑक्टोबर) रात्री अचानक हजेरी लावली आहे.

रात्री सुमारे 8.30 वाजल्यापासून वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुंबई जवळील अनेक उपनगरीय भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे. अचानक आलेल्या पावसाने लोकांची भलतीच तारांबळ उडाली.

बृहन्मुंबई महागरपालिकेच्या अधिकृत Twitter हॅण्डलवरून आजच्या हवामानाबद्दलची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आज संध्याकाळी काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

ट्विटरवर देखील अनेक जणांनी पाऊसाचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत.

बदलापूर मध्ये तब्बल 21 मिनिटांत 101 मी.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे एक ट्विट सध्या फिरत आहे.