कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहून संपूर्ण देश हादरून गेला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोगाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने राज्यातील लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून योग्य ते पाऊल उचलले जात आहे. यातच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ धुतल्यानंतरच दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे, असा निर्णय मुंबई (Mumbai) येथील माहिम (Mahim) परिसरातील सेंट मायकल हायस्कूलने (St Michael High School) घेतला आहे. नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द केल्याची माहिती दिली होती. तसेच नववी आणि आकरावीची उर्वरित परिक्षा काही दिवसानंतर घेतली जाणार असल्याचेही सांगितले आहे. परंतु, दहावीची परिक्षा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असते. यामुळे दहावीची परिक्षा सुरुच राहणार असल्याचे समजत आहे.

संपूर्ण भारतातून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांच्या यादीत झपाट्याने वाढू होऊ लागल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर होती. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी 11 रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे. दरम्यान, मुंबई येथे 10 तर, पुण्यात 1 रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. यांपैकी 8 जण परदेशातून भारतात आलेले आहेत. तर, 3 जण संसर्गातून कोरोनाबाधित झाले आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहेत. कोरोना व्हायरसचे देशात सध्या 246 रुग्ण असून यांची संख्या अजून वाढू नये, म्हणून सरकारकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- अमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर

एएनआयचे ट्वीट-

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. चीनमध्ये जन्मलेला या व्हायरसने इटलीमध्ये धुमाकूळ घातला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासात 627 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.