मुंबईसह संयुक्त महापालिकेच्या परिसरात व्हेंटिलेटर्सची कमरता भासून येत आहे. त्यामुळे रविवारी सरकारच्या बहुतांश जम्बो कोविड सेंटर्समध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी गैरसोय निर्माण झाली आहे. तर मिरा भायंदर महापालिकेकडे 40 आयसीयु बेड्स आहेत. महापालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांनी असे म्हटले की, आता सर्व आयसीयु भरले आहेत. त्याचसोबत वसई विवार महापालिकेकडे 17 कोविड हॉस्पिटल्स आहेत. बेड्स देण्यासंदर्भात आकडेवारी सांगणारे अविनाश गुंजाळकर यांनी म्हटले की, आमच्याकडील सर्व आयसीयु आणि व्हेंटिलेटर्स सुद्धा पूर्णपणे भरले आहेत.
निमेश बागडिया या व्यक्तीने असे म्हटले की, त्याने व्हेंटिलेटर्स ते ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचे पाहिले आहे. त्याच्या धाकट्या भावाला मिरा रोड मधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी दाखल केल्याच्या दोन दिवसांनी डॉक्टरांनी आमच्याकडे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने तुम्ही दुसरे रुग्णालय पहा असे बागडिया याला म्हटले.(Coronavirus: उल्हासनगर महानगरपालिकेची मोठी कारवाई, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 22 लाखांची वसूली)
शुक्रवारी जगशदिश याला कांदिवली मधील सेव्हन स्टार रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे सुद्धा दुसऱ्या रुग्णालयात आयसीयुसाठी पहा असे सांगितले. त्याच्या भावाला Guillian Barre Sybdrome असल्याने त्याच्यावर मल्टीस्पेशालिटी उपचार करण्याची गरज होती. त्यामुळे बागडिया याने स्वत: 18 रुग्णालयांना भेट दिली पण तेथे त्याला आयसीयु उपलब्ध झाले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बागडियाने त्याच्या भावाला केईएम रुग्णालयात असलेल्या आयसीयु मध्ये दाखल करण्यासाठी धावपळ केली.(मुंबईत BPCL जवळ उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरला रोज 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार- BPCL PRO)
दरम्यान, आयुक्त आय एस चहल यांनी असे म्हटले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1500 ते 2500 आयसीयु बेड्स शहरात आहेत. मात्र येत्या आठवड्यात आणखी 100 बेड्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याने चहल यांनी सांगितले. तर 11 रुग्णालयांमधील सहा मध्ये ऑक्सिजन किंवा बेड्सच शिल्लक नाहीत.