Mumbai Shocker: जेलमधून सुटताच 2 दिवसांत जावयाने काढला सासूचा काटा; शुल्लक कारणावरुन केली हत्या
Representational Image (Photo Credits: Twitter)

मुंबईतून (Mumbai) एक विचित्र घटना समोर येत आहे. जेलमधून सुटलेल्या व्यक्तीने 2 दिवसांतच सासूची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पुन्हा लग्न झालेल्या मुलीचा नवा पत्ता सांगण्यास सासूने नकार दिल्याने जावयाने सासूची हत्या केली आहे. पुण्यातील येरवडा जेलमधून सुटतानंतर अवघ्या 2 दिवसांत त्याने पुन्हा गुन्हा केला. विले पार्ले (Vile Parle) येथे 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अब्बास शेख (42) असे आरोपीचे नाव असून शामल सिंघम (61) असे मृत महिलेचे नाव आहे. (Mumbai Shocker: झोपेत असलेल्या पत्नीची दिव्यांग वृद्ध व्यक्तीकडून चाकू भोकसून हत्या)

चोरी केल्याने आरोपीला 3 वर्षांपूर्वी जेल झाली होती. तो जेलमध्ये असताना आपले दुसरे लग्न झाले असल्याचे आरोपीची पत्नी लीना हिने त्याला सांगितले होते. मात्र तरी देखील त्याला तिच्यासोबत राहायचे होते. यासाठी जेलमधून सुटताच त्याने आपल्या बायको-मुलांना भेटण्यासाठी सासूचे घर गाठले. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता शेख विलेपार्ले येथील आपल्या सासूच्या घरी गेला आणि मुलीचा नवा पत्ता मागू लागला. मात्र सासूने तो देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण सुरु झाले.

या भांडणादरम्यान त्याने सासूचे डोके वारंवार जमिनीवर आपटले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे. सासूच्या हत्या केल्यानंतर आरोपीने घरमालकाला धमकी देऊन घरमालकाकडून 3000 रुपये चोरले. त्यासोबतच काही दारुच्या बॉटल्स चोरुन त्याने पुण्याला पळ काढला.  मात्र पोलिसांच्या टीमने त्याला शोधून ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी विरुद्ध मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 28 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.