Mumbai Shocker: आईला सुर्‍याचा धाक दाखवत 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार
Representative Image

देशभर पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई मधील मुलूंड (Mulund) परिसरामध्ये आईला सुर्‍याचा धाक दाखवत एका 15 वर्षीय चिमुरडीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान चिमुकलीवर बलात्कार प्रकरणाच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार प्रकरणी पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय एक आरोपी अटकेत आहे तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. हे आरोपी परराज्यात पळून गेल्याचा अंदाज आहे. पोलिस एफआयआर मध्ये नमूद केल्याप्रमाणे पीडीत तरूणीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केले असल्याचे आरोप आहेत. नक्की वाचा: Mumbai Shocker: धक्कादायक! मुंबईत आरे कॉलनीत रिक्षा चालकाचा तरुणीवर बलात्कार; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक .

मुंबई मध्ये मागील काही महिन्यांत महिलांवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता देशाची आर्थिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईतही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे. सध्या पोलिस मुलुंडच्या प्रकरणामध्ये विविध अंगाने तपास करत आहेत.