विधानसभा निवडणूकीचे निकाल गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी करत असून उद्या मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून शिवसेनेचे नवनिर्वातीच आमदारांसह नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदरांचा कल जाणून घेणार असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेने यंदा भाजप सोबत महायुती केली होती. तर विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र त्यानंतर आता शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा निकालानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही शिवसेनेसोबत भाजपने केलेला 50-50 फॉर्म्युलाची आठवण करुन दिली. जागावाटपाच्या वेळी समजून घेतली परंतु आता समजून घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(वरळी मध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी; आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून अभिनंदन)
मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे आमदरांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या पुढील रणनितीबाबत सुद्धा त्यांचा काय कल आहे याबाबत जाणून घेणार आहे. तर वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.त्याचसोबत पोस्टरवर मा. भावी मुख्यमंत्री असे सुद्धा लिहिण्यात आले आहे.