Dilip Lande| Photo Credits: Twitter/ ANI

एकीकडे मुंबई महानगरपालिकेने 104% नालेसफाई केल्याचा दावा केलेला असताना मुंबईच्या चांदिवली भागातील शिवसेनेच्या आमदारांनी नालेसफाईच्या कामावरून कंत्राटदारासोबत अमानुष वागणूक केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. ANI ने ट्वीट केलेल्या या व्हिडिओ मध्ये शिवसेना आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी कंत्राटदाराच्या नालेसफाईच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला साचलेल्या पाण्यात बसवून त्यांच्या अंगावर कचरा टाकण्याचे आदेश दिल्याचंही पहायला मिळालं आहे. हा सारा प्रकार मोबाईल मध्ये शूट झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात आता व्हायरल देखील झाला आहे. Mumbai Rains: मुंबईकरांसाठी Open Manhole ठरतायत जीवघेणे; पाहा व्हिडिओ.

दरम्यान काल (12 जून) मुंबई मध्ये तुफान पाऊस कोसळत होता. 12 तासांच्या पावसातच मुंबई अनेक ठिकाणी तुंबली होती. पश्चिम उपनगरामध्ये चांदिवली भागातही पाणी साचलेलं बघून आमदार दिलीप लांडे काही कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथे त्यांनी कंत्राटदाराला बोलावून त्याला पावसात पाण्यात बसवून त्याच्यावर कचरा टाकला. तर ANI शी बोलताना त्यांनी हा प्रकार 'कंत्राटदाराने काम योग्य प्रकारे केलं नसल्याने' केल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet

दिलीप लांडेंची प्रतिक्रिया

दिलीप लांडेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना मागील 15 दिवसांपासून कंत्राटदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. रस्ता स्वच्छ करण्यासाठी विणंती करत होतो मात्र त्याने हे केले नाही. नंतर शिवसेनेच्या लोकांनी कामाला सुरूवात केली. मग कंत्राटदार आला असे दिलीप लांडे म्हणाले.नंतर ही जबाबदारी त्याची असल्याचं सांगितल्याचेही दिलीप लांडेंनी म्हटलं आहे.

मुंबई मध्ये येते काही दिवस मुसळधार पावसाचे आहे. 9 जूनला मुंबईत मान्सून दाखल झाल्यापासून सतत तुफान बॅटिंग सुरू आहे. अशामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने मुंबईच्या वेगाला ब्रेक लागत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेविका संध्या दोषी यांचा देखील एका रूग्णालयात कोविड नातेवाईक रूग्णाला बेड न मिळाल्याने हॉस्पिटल प्रशासनासोबत हुज्जत घालत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. या प्रकारानंतर त्यांनी सोशल मीडियातून संबंधित प्रकाराबाबत माफी मागितली होती.