Free Oxygen Cylinders| Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई (Mumbai) हे कोरोनाच्या विळख्यात अडकलेलं सर्वात मोठं शहर आहे. देशा-परदेशातून लोकं मुंबईमध्ये येतात. हे शहर दाटीवाटीचं असल्याने या शहरात कोरोना झपाट्याने वाढला. आजही अनेकांना कोरोनाचं निदान झाल्यानंतर बेड मिळत नाही तर अनेकांना ऑक्सिजन, इंजेक्शन, व्हेंटिलेटर्स वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचा घटना समोर येतात. अशा कठीण काळातही शहनवाझ हुसेन (Shahnawaz Hussain) आणि अब्बास रिझवी (Abbas Rizvi) हे कोरोना रूग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलेंडर्स (free oxygen cylinders) देण्याचं काम करत आहेत. दरम्यान श्वसनाचा त्रास असणार्‍या इतर रोगाशी लढणार्‍यांनाही ते ही सोय खुली करत आहे.

मुंबईकरांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर्स देण्याच्या या कल्पनेमागे एक दु:खद घटना आहे. काही दिवसांपूर्वी अब्बासची सहा महिन्यांची गरोदर बहीण वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यूमुखी पडली. या घटनेनंतर अब्बास आणि त्याच्या मित्राला कोरोना संकटाची दाहकता अजून जवळून समजली. त्यांनी जात, धर्म, आर्थिक स्तर काहीही न बघता आता इतरांसाठी मोफत ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करण्याला सुरूवात केली आहे. दरम्यान त्यासाठी केवळ डॉक्टरांचं प्रिस्क्रिब्शन आवश्यक आहे.

शहनवाझने या ऑक्सिजन सिलेंडर्सची वाढती गरज पोहचवण्यासाठी त्याची एसयुव्ही कार देखील विकली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये या मित्रांच्याजोडगोळीने सुमारे 250-300 सिलेंडर्स पोहचवले आहेत. दरम्यान 48 तासांसाठी ते मुंबईमध्ये कुठेही मोफत सोय उपलब्ध करून देतात. अब्बास सांगतो' रात्रीच्या वेळेस ऑक्सिजन सिलेंडर्सची मागणी अधिक असते. नियमित 10-15 सिलेंडर्स तो पोहचवतो. COVID19 Updates In Mumbai: मुंबईत एकूण 68 हजार 481 कोरोनाबाधित; दिवसभरात 846 नव्या रुग्णांची नोंद, 42 मृत्यू.

मुंबईमध्ये धारावी, वरळी अशा भागांत फैलावलेला कोरोना आता नियंत्रणामध्ये आला आहे. मात्र मुंबईच्या उत्तर दिशेच्या उपनगरांमध्ये तो वाढत आहे. हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळालं असलं तरीही आता त्याचा धोका अजून संपलेला नाही.