धक्कादायक! मुंबई येथील गोरेगाव परिसरात ५५ वर्षीय पत्नीची हत्या करुन ६० वर्षीय पतीची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) येथील गिरगाव (Girgaon) परिसरात ५५ वर्षीय पत्नीची हत्या करुन स्वत: पतीने  आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आनंद मखीजा आणि कविता असे मृतांची नावे आहेत. पत्नीच्या आजाराने कंटाळलेल्या आनंदने तिच्यावर चाकूने वार करून गिरगावमधील महिंद्र मॅन्शन येथील अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की, आनंदचा मृतदेह सापडल्यानंतर महिंद्रा मॅन्शनमधील रहिवाशांकडून सायंकाळी 6.15 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला कॉल आला. त्यानंतर आनंदला ताबडतोड जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात आनंदचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ज्यावेळी पोलिस चौकशीसाठी आनंद मखीजाच्या घरी गेले, तेव्हा त्यांना आनंद याचे घर आतून बंद असल्याचे आढळले.

पोलिसांनी या दामपत्यांची मुलगी दीपा मखीजाशी संपर्क साधला. दिपा कामावरून घरी परत आल्यानंतर पोलिसांनी सांगितल्यानुसार दार उघडले. घरात गेल्यानंतर पोलिसांना कविताचा मृतदेह सापडला. त्यावेळी कविताच्या छातीवर आणि पोटावर वार झाल्याचे दिसले. गेल्या पाच वर्षांपासून तिच्या आईला श्वासोच्छवासाचा त्रास होता. तिची काळजी घेवून तिचे वडील त्रस्त झाले होते. कदाचित यातूनच ही घटना घडली असावी, अशी माहिती दिपाने दिली. दिपाने दिलेल्या माहितीवरुन एलटी मार्ग पोलिसांनी आनंद विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या

दीपा विक्री कार्यकारी म्हणून काम करत असताना हे कुटुंब घरगुती उपकरणांचा व्यवसाय करते. यांचे चेंबूरमध्ये दुकान होते. पोलिओने ग्रस्त असलेला आनंदचा धाकटा भाऊही या दामपत्यांसह राहायचा. ही घटना घडली तेव्हा तो दुकानात होता, असे पोलिस अधिकारी म्हणाले. कविता यांच्यावर वार करण्यासाठी वापरलेला चाकू फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिस टेस्टसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.