मुंबईतील (Mumbai) हवेची गुणवत्ता (Air Quality) दिवसेंदिवस ढासाळत असून मुंबईची हवा ही जगभरातील सर्वात प्रदूषित (pollution) शहरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर पाकिस्तानातील लाहोर (Lahore) शहराचा समावेश आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir (Swiss Air Tracking Index IQAir) नुसार, 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान मुंबईतील हवेतील प्रदुषण हे जगातील सर्वात प्रदूषीत शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाहनांचा धूर, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमधून निर्माण होणारी धूळ यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे. NEERI आणि IIT-B च्या 2020 च्या संशोधनानुसार, मुंबईच्या हवेतील 71% पेक्षा जास्त प्रदूषणासाठी रस्ते किंवा बांधकामातून उडणारी धूळ आहे.
प्रदुषणाच्या बाबतीत मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर दिल्लीला देखील मागे टाकले आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. हवेची गुणवत्ता खालवत असल्यानं मुंबईकरांचा श्वास गुदमरत असून प्रदूषीत हवे मुळे वृद्धांना श्वसनांचा त्रास जाणवत असून सर्वाधिक त्रास हा अस्थमा असलेल्या नागरिकांना होत आहे.
जगभरातील सर्वात प्रदूषित टॉप १० शहरांमध्ये पहिला क्रमांक हा पाकिस्तानातील लाहोर शहराचा लागतो तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानातील काबूल शहर आहे. यांनतर चौथ्या क्रमांकावर तैवानमधील काओशुंग, पाचव्या क्रमांकावर किर्गिस्तानातील बिश्केक, सहाव्या क्रमांकावर घानातील अक्रा, सातव्या क्रमांकावर पोलंडमधील क्राको, आठव्या क्रमांकावर कतार मधील दोहा, नवव्या क्रमांकावर कझाकस्तान मधील अस्ताना आणि दहाव्या क्रमांकावर चिलीमधील सॅटियागो हा शहराचा क्रमांक आहे.