मुंबई मध्ये आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची रेलचेल पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान काल (17 नोव्हेंबर) कल्याण स्थानकांत एक महिला प्रवासी चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये पडल्या होत्या. मात्र प्लॅटफॉर्मवर ऑनड्युटी असलेल्या एका आरपीएफ कॉन्स्टेबलने कर्तव्यदक्षता दाखवत धोका वेळीच ओळखला आणि महिलेला सुरक्षित वाचवलं. दरम्यान ही महिला Udyan Special ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन पडली. दुर्देवाने थेट प्लॅटफॉर्मऐवजी ती ट्रेनच्या दोन कोचेसमध्ये असलेल्या गॅपमध्ये धडपडली.
महिला पडलेली लक्षात येताच विजय सोळंकी या SIPF, RPF या कल्याण स्थानकावर तैनात असलेल्या कर्मचार्याने पाहिलं आणि तिला खेचून बाहेर काढलं. त्यावेळेस काही प्रवासी देखील मदतीला आले. आणि पुढचा मोठा अनर्थ टळला. Mumbai Local Accident: घाटकोपर स्थानकात धावत्या लोकल मध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिला प्लॅटफॉर्मवर पडली; RPF कर्मचार्याच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला (Watch Video).
मध्य रेल्वे ट्वीट
Sh. Vijay Solanki, SIPF, RPF, Kalyan noticing a female passenger trying to board a moving train at Kalyan station fallen into the gap between the platform & train, immediately rushed to the spot and pulled her out & saved her. CR appreciates him for his alertness. pic.twitter.com/sOdJJKmMkP
— Central Railway (@Central_Railway) November 17, 2020
महिला प्रवासीला मदत केल्याने विजय सोळंकी यांचंदेखील मध्य रेल्वेकडून कौतुक करण्यात आले आहे. दरम्यान ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. चालत्या गाडीत चढणं किंवा उतरणं जीवावर बेतू शकतं. तसेच उतरताना चूकीच्या दिशेने उतरल्यामुळे देखील अनेकदा अपघात झाल्याचं निदर्शनास आले आहे.