वरळी च्या हिट अॅन्ड रन प्रकरणानंतर (Worli Hit and Run Case) आता वसई (Vasai) मध्येही असाच एक अपघात समोर आला आहे. कारची स्पोर्ट्स बाईकला धडक बसल्यानंतर तरूणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना 10 जुलैची आहे. अपघातामध्ये कार चालक तरूण पांडे होता. तरूणचे वडील नालासोपरा मध्ये भाजापा कार्यकर्त्याचा मुलगा आहे. दरम्यान दुचाकीवरील मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. तरूण पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
Times of India,च्या वृत्तानुसार, मृत मुलाचं नाव अमित सैनी आहे. अमित हा वसई मध्ये फादरवाडी चा रहिवासी होता. सैनी हा बाईकवर हेल्मेट घालून बसला होता. तरूण पांडे याची डाव्या बाजूने गाडी ओव्हरटेक करताना गाडीचा पुढचा भाग आपटून तो खाली पडला. Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी Mihir Shah ला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वडील Rajesh Shah यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी .
तरूण पांडे याने कार थांबवली. जवळच असलेल्या दोघांची मदत घेत त्याने सैनीला Cardinal Gracious Hospital मध्ये नेले. मात्र अमितचा यामध्ये मृत्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार तरूणने अमित बैशुद्ध असल्याचं लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. Ghodbunder Road Rage: बेस्ट बस आणि ट्रक यांच्या चालकांमध्ये वाद, खासगी वाहनाचे आरसे फोडले (Watch Video) .
अपघातानंतर तरूण पांडे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. ही कार तरूणचे वडील Prakash Pandey यांच्या नावावर आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.