Rhea Chakraborty | Photo Credits: Twitter/ ANI

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी आणि तपासाला आता वेग आला आहे. आज मुंबईच्या डीआरडीओ गेस्ट हाऊसवर सीबीआय चौकशीसाठी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि मियांडा सॅम्युअल दाखल झाले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून सिद्धार्थची सातत्याने चौकशी केली जात आहे. आज पहिल्यांदा रिया चक्रवर्ती सीबीआय समोर हजर झाली आहे. दरम्यान रियासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीदेखील हजर आहे.

दरम्यान 14 जून दिवशी सुशांतने गळफास घेऊन आतमहत्या केली होती. त्यानंतर रजपूत कुटुंबाने रियाला सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती. काल सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया सुशांतची खुनी आहे ती मागील काही काळापासून त्याला विष देत असल्याचे आरोप लावले आहेत.

ANI Tweet

दरम्यान काही दिवसांपूर्वी रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लिक झाले होते. त्यावर ड्रग्जच्या खरेदीवर काही संभाषण आढळलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ड्रग्जच्या अनुषंगानेदेखील तपास सुरू झाला आहे.