Mumbai: गँगस्टर रवि पुजारी याला 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, मुंबईत 49 पेक्षा अधिक गुन्हे दाखल
Ravi Pujari (Photo Credit: Twitter)

Mumbai: गँगस्टर रवि पुजारी (Ravi Pujari) याला आज मुंबईतील एका कोर्टात हजर करण्यात आले. त्यानुसार कोर्टाने पुजारी याला येत्या 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रवि पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कधी काळी छोटा राजन याच्या सोबत मिळून काम करणाऱ्या रवि पुजारी याने नंतर आपली वेगळी गुंडांची गँग तयार करुन हफ्ता वसूली करु लागला होता. परदेशात राहून मुंबईत गुन्हे करणाऱ्या पुजारी याने बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. पुजारीला दक्षिण अफ्रिकेतील सेनेगल येथून भारतात आणले गेले होते. तसेच याच्या विरोधात कर्नाटक आणि बंगळुरु मध्ये काही गुन्हे दाखल असल्याने त्याला कर्नाटकातून आणण्यात आले. तर तपास पूर्ण झाल्यानंतर पुजारी याला मुंबईत आणले गेले.

नुकत्याच कर्नाटकातील एका कोर्टाकडून पुजारी याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांना मंजुरी दिली होती. मुंबईतील संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भरंबे यांनी असे म्हटले की, पुजारी याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.(Ravi Pujari: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांना परवानगी)

Tweet:

पुजारी जवळजवळ गेल्या एका वर्षापासून कर्नाटकातील तुरुंगात शिक्षा भोगत होता. याआधी तो काही वर्ष फरार होता. पण गेल्या वर्षातच फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका येथून भारतात आणले गेले. एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, जबरदस्तीने वसूली करणाऱ्या पुजारी याला 21 ऑक्टोंबर 2016 मध्ये विले पार्ले मध्ये झालेल्या गोळीबारच्या घटनेत अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुजारीचे साथीदार हे आधीपासूनच तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मूळ रुपात कर्नाटकातील उडुपी येथे राहणारा पुजारी विदेशातून जबरदस्तीने वसूली रॅकेट चालवत होता. ज्यामध्ये व्यावसायिक, चित्रपटातील कलाकार यांना त्याने आपले लक्ष्य केले होते.