Mumbai: रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे म्हणत अॅड. पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Rashmi Thackeray and family (Photo Credits-Twitter)

Mumbai:  सर्वत्र 26 जानेवारी निमित्त 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. याचमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे म्हणत  अॅड. पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर या प्रकरणी चौकशी करुन रश्मी ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली गेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजाचा समारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थितीत होत्या. तर राष्ट्रगीत झाल्यानंतर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी झेंड्याला सलाम केला. पण रश्मी ठाकरे तशाच उभ्या असल्याचे दिसून आले. यामुळेच आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अॅड. जयश्री पाटील यांनी केली आहे.

अॅड. पाटील यांनी असे म्हटले की, रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या असल्याने त्यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.(Nirbhaya Squad: मुंबईत 'निर्भया स्कॉड' चं थीम सॉंग लॉन्च करण्यात आल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

Tweet:

दरम्यान,  मुख्यमंत्री निवासस्थानी सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थितीत होते.