एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Mumbai Rape Case) झाल्याच्या घटनेने मुंबई सुन्न झाली आहे. शहरातील राम मंदिर स्टेशन (Ram Mandir Station) परिसरात पीडित मुलगी बेशुद्ध आवस्थेत आढळून आली. या प्रकरणात एका रिक्षाचालकास मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडितेवर सिजेरीयन ब्लेडने (Caesarean Section Blade Attack) हल्ला झाल्याचे आणि तिच्या गुप्तांगात दगड (Stone in Private Parts) भरल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पीडितेस वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संशयित रिशाचालकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील राम मंदिर स्टेशन परिसरात एक तरुणी बेशुद्ध आवस्थेत आढळून आली. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी तिला केईएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. संतापजनक असे की, पिडितेच्या गुप्तांगावर सीजेरियन ब्लेडने हल्ला केल्याचे पुढे आले. तसेच, तिच्या गुप्तांगात काही दगडही आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर तातडीने सतर्क झालेल्या पोलिसांनी एका रिक्षाचालकास संशयावरुन अटक केली आहे. रतन वालवल असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. (हेही वाचा, Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत)
पीडिता नालासोपारा येथील राहणारी
प्राथमिक माहिती अशी की, पीडिता आपल्या कुटुंबासोबत नालासोपारा परिसरात राहते. तिच्यासोबत हा प्रकार कसा घडला, आरोपीने तिच्यावर अत्याचार करुन येथे सोडून दिले की, याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला, या घटनेत एकूण किती लोकांचा समावेश आहे, यांसारख्या प्रश्नांचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, एका अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी बलात्कार आणि इतर काही आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा, Mumbai Rape Case: मुंबई येथील महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या लुधियाना मधून आवळल्या मुसक्या)
महिला, लहान मुले यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती आणि मदत मिळविण्यासाठी पीडित किंवा गरजू व्यक्ती खालील क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.
दरम्यान, मुंबईमध्ये घडलेल्या आणखी एका प्रकरणात 20 वर्षीय तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर 70 वर्षीय महिलेवर बरात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील पीडिता ज्येष्ठ नागरिक आरोपीच्या कुटुंबासोबत जवळच राहत होती. घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला स्मृतिभ्रंश आणि इतर आजारांनी ग्रस्त आहे. पोलिसांनी सांगितले की, 8 जानेवारी रोजी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात ती झोपेत असताना प्रवेश केला, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी संशयाच्या आधारे एका तरुणास ताब्यात घेतले आहे.