Mumbai Rains Update: मुंबईतील विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे साचले पाणी, पहा व्हिडिओ
Mumbai Rains (Photo Credits-Facebook)

Mumbai Rains Update:  मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सकाळ पासूनच सुरुवात झाली आहे. तर मुंबईत विजांच्या कटकटासह पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच आता मुंबईतील विविध ठिकाणी पाणी साचल्याची दृष्ये समोर आली आहेत. तर नागरिकांना सुद्धा कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने प्रत्येक वर्षाप्रमाणे 10 जूनला मुंबईत पाऊस दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र 9 जूनलाच पाऊस दाखल झाल्याचे दिसून आले आहे. तर मुंबईतील सखल भागात दरवर्षी जोरदार पाऊस झाल्यानंतर पाणी साचते. आता सुद्धा मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे सायन परिसर, गांधी मार्केटसह विविध ठिकाणी पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

हवामान खात्याने 9-12 जून दरम्यान मुंबई, पुणे आणि कोकणासह काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचत असल्याने महापालिकेकडून त्याच्या कर्मचाऱ्यांना तेथे तैनात करण्यात आले आहे.  आयएमडीनुसार वेगाने वारे वाहण्यास मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा येथील काही भागात येत्या दिवसात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे अलर्ट जाहीर केला आहे.(Dangerous Buildings: पावसाळयाआधी मुंबईमधील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी जाहीर; MHADA ने केले सर्वेक्षण See List)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

तर मुंबईतील पावसाची स्थिती पाहता महापालिकेने तयारी केली आहे. बुधवार सकाळ पासून शहरातील काही भागात तुफान पावसामुळे पाणी साचले आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी असे म्हटले आहे की, पाणी साचण्यापासून बचाव करण्यासाठी हिंदमाता परिसरात दोन मोठे टँक तयार करण्यात आले आहेच. त्यात सखल भागातील पाणी जाणार आहे.

दरम्यान, रायगड मध्ये सुद्धा हायअलर्ट जाहीर करण्यात आला असून 103 गाव खाली करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड मधील समुद्र किनाऱ्यावरील आणि डोंगराळ भागातील गावांमधील लोतांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. येत्या 11-12 जून रोजी तुफान पावसाची शक्यता येथे व्यक्त करण्यात आली आहे.