मुंबई शहर (Mumbai City) , मुंबई उपनगर आणि राज्यातील विविध ठिकाणी परतीच्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. मुंबईत मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai City) कोसळत आहे. या पावसाने इतिहासाची पुनरावृत्ती करत पाठीमागील 39 वर्षांपूर्वी पडलेल्या पावसाची आठवण करुन दिली आहे. मुंबई शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून अनेक ठिकाणी मुंबापूरीची तुंबापुरी झाल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा पुरवत जनजीवन स्थिर राखण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, राजकारण्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या सरी बरसत आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर( Pravin Darekar) यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
इतिहासाची पुनरावृत्ती 39 वर्षांनंतर पहिल्यांदाच असा पाऊस
हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पडलेल्या पावसाने विक्रम मोडीत काढत 39 वर्षापूर्वीच्या पर्जन्य स्थितीची आठवण करुन दिली आहे. एका आकडेवारीनुसार 23 सप्टेंबर 1981रोजी मुंबईत विक्रमी 318.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज (23 सप्टेंबर 2020) 286.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. (हेही वाचा, Mumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत)
All Time Record for Mumbai Scz Rainfall in September is 318.2 mm on 1981, Sept 23.
Today on Sept 23, Scz recorded 286.4 mm
Last 10 year's Sept Month 24 hrs highest RF is summarised below with date of occurance in bracket. Last Column. pic.twitter.com/hRT2VKWpmU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2020
आदित्य ठाकरे यांची आपत्कालीन कक्षास भेट
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबईत आज पडलेल्या पावसाचे वैशिष्ट्य असे की, एकूण सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस आज एका दिवसात पडला आहे. ठाकरे यांनी मुंबई महापालिका आपत्कालीन कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावाही घेतला. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता)
आदित्य ठाकरे ट्विट
Visited the @mybmc HQ today to take stock of the situation after the torrential rains that lashed the city over the last night.
• Parts of Mumbai have received over 83% of the annual normal September rainfall in less than 12 hours.
• flood water pumped out= 1 Tulsi lake pic.twitter.com/9HbDCv06MA
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2020
मुंबई पाऊस ठळक मुद्दे
- मुंबई सेंट्रल एसटी आगारात भरले पाणी
- 35 वर्षांत प्रथमच भरले एवढे पाणी
- वरळीतील घरांमध्ये पाणी
- परळ येथील बीआयटी चाळ
- कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर, बैल बाजार पुलाजवळील मिठी नदी तुडुंब भरली
मुंबईत गेल्या 24 तासात पडलेला पाऊस (सकाळी 10 पर्यंत)
(आकडेवारी सौजन्य मुंबई महापालिका ऍप)
- मुंबई सेंट्रल - 166 mm
- वांद्रे पश्चिम - 232 mm
- हाजी अली - 269 mm
- हिंदमाता - 289 mm
- कांदिवली पश्चिम - 302 mm
- किंग्ज सर्कल - 310 mm
- मंत्रालय - 169 mm
- मुंबई डोमेस्टीक एअरपोर्ट - 239 mm
- मुंबई पालिका मुख्यालय परिसर - 313 mm
- शिवडी - 325 mm
- धारावी - 312 mm
- वडाळा - 199 mm
- मुलुंड रेल्वे स्टेशन परिसर - 184 mm
किनारपट्टीलगतच्या भागात सतर्कतेचे अवाहन
मुंबई शहरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हा जोर इतक्या कमी येण्याची चिन्हे दिसत नाही. दुसऱ्या बाजूला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. मुंबई आणि समुद्र किनारपट्टीलगतच्या भागात पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे अवाहन हवामान विभाग आणि पालिकेनेही केले आहे.
राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या सरी
दरम्यान, एका बाजूला पाऊस कोसळून मुंबईची तुंबई होत आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय मंडळींकडून आरोप-प्रत्यारोपांच्या सरी कोसळत आहेत.
'केम छे वरळी'
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 'केम छे वरळी' म्हणत पावसाने साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
केम छो वरळी pic.twitter.com/pWiGcgwPU1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 23, 2020
एकाच रात्रीत मुसळधार पाऊस त्यामुळे साचले पाणी
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, एकाच रात्रीत मुसधार पाऊस आल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले. मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी उपाययोजना करून पाणी काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
प्रविण दरेकर ट्विट
पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली तरी काय करतेय ही @mybmc शिवसेना @ShivSena सरकार? @KanganaTeam आणि नोसैना अधिकारी मदन शर्मा यांच्यांशी वादंग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर या कामांकडे लक्ष दिले असते तर आज सामान्य जनतेला या नाहक त्रासाला बळी पडावे लागले नसते. pic.twitter.com/8sxR4eobc6
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 23, 2020
दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावत मुंबईतील कलानगर परिसरातील पाणी ओसरले. मात्र, त्याच वेगाने मुंबई शहरातील इतर ठिकाणांवरचे पाणी का ओसरले नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. कलानगर परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान आहे. त्यावरुन दरेकर यांनी हा टोला लगावला आहे. दरम्यान, उगाच साचलेल्या पाण्याचे खापर पावसावर फोडू नका. शहरातील अनेक ठिकाणांवरील पंपींग स्टेशन्स का बंद आहेत ते सांगा असेही दरेकर यांनी म्हटले आहे.