Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये काल (22 सप्टेंबर) पासून धूमशान घालणारा पाऊस आता आज सलग दुसर्‍या दिवशी (23 सप्टेंबर) देखील बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे सह कोकणातील काही भागांमध्येही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तेथे 24 तासांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. त्यामुळे सामान्यांनी अत्यंत गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ल देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना पाऊस आणि वार्‍याचा जोर पाहता खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये काल पडलेल्या पावसाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मुंबई शहरातील एकूण पाऊस हा 286.4 मीमी इतका झाला आहे. हा पाऊस मागील 15 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील मोठा पाऊस आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत कुलाबामध्ये 147.8 मीमी तर सांताक्रुझ मध्ये 286.4 मीमी इतका नोंदवण्यात आला आहे.

KS Hosalikat Tweet

विदर्भामध्ये पाऊस  

 

पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काल पासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला पावसाने झोडपून काढलं आहे. यामध्ये पालघर, रायगड येथे देखील पाऊस बरसला असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे.