Mumbai Rains Update:  मुंबई,ठाणे परिसरात मुसळधार पाऊस; सखल  भागात पाणीच पाणी
Rain | (Photo credit: Archived, edited, and representative images)

यंदाच्या मान्सूनमधील तिमाहीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असला तरीही मुंबई, पुणे, कोकण सह महराष्ट्रात कोसळधार अनेक ठिकाणी सुरूच आहे. मुंबईतही आज (15 सप्टेंबर) पावसाच्या काही दमदार सरी बरसल्याने सखल भागांमध्ये पाणी भरल्याचं चित्र आहे. काल रात्रीपासून अनेक ठिकणी पावसाच्या काही जोरदार सरी बरसल्याने जनजीवन थोडं विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये मागील काही तासांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. डोबिंवली, कल्याण भागातही पावसाचा जोर कायम आहे. यंदा पाऊस उशिरा आला असला तरीही सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंतही त्याचा जोर कायम आहे.

मुंबई हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे मीरा - भायंदर, वसई, भिवंडी ,अंधेरी, बोरीवली, कांदिवली या भागातही जोरदार पाऊस बरसला आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईतही पावसाचा जोर आहे. सध्या अधून मधून पाऊस बरसत असला तरीही रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे.Mumbai Mega Block on September 15: मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत परतीचा मान्सून असेल. 17 सप्टेंबर नंतर हळूहळू पाऊस कमी होण्यास सुरूवात होईल. वातावरणातील बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यंदा विलंब झाला आहे.