Mumbai Mega Block on September 15: मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Mega Block Update: मुंबईमध्ये मागील आठवड्यात गणेशोत्सवाची धामधूम असल्याने मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता. मात्र आज (15 सप्टेंबर) मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. आज हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 11 ते 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विकेंडला बाहेर पडण्याचा प्लॅन करणार असाल तर रेल्वे प्रवास करताना आजचं प्लॅनिंग रेल्वेचे हे वेळापत्रक पाहूनच करा. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर हार्बर वर वाशी-पनवेल मार्गावरील अप-डाऊन मार्गावर आणि माहिम- गोरेगाव मार्गावर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सध्या मुंबईत सकाळपासून पावसाचा जोरही कायम आहे. M- Indicator Update: आता लोकलची अचूक वेळ आणि ठिकाण जाणून घेत प्रवास करा सुकर, जाणून घ्या काय आह नवीन अपडेट

मध्य रेल्वे मार्गावर

कल्याण-ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर 11.20 ते 3.50 पर्यंत मेगाब्लॉक. कल्याण स्थानकातून सुटणार्‍या स्लो आणि सेमी फास्ट लोकल 10:48 ते दुपारी 3:51 यावेळेत फास्ट कल्याण-मुलुंड दरम्यान फास्ट लाईन वरून चालवण्यात येतील तर मुलुंड नंतर त्या पुन्हा स्लो ट्रॅकवर चालवणार आहेत. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरुन लोकल धावणार नाहीत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हाया ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकातून जाता येणार आहे.

हार्बर मार्गावर

हार्बर मार्गावर वाशी - पनवेल अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल तर पश्चिम उपनगरातील माहीम ते गोरेगाव या स्थानकांदरम्यानही अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. पनवेल-अंधेरी मार्गावरील सर्व लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान स्पेशल लोकल ब्लॉकवेळी धावणार आहेत.

पश्चिम मार्गावर

पश्चिम मार्गावरही माहीम ते गोरेगाव या स्थानकांदरम्यानही अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल.

ट्रान्स हार्बर

ट्रान्स हार्बरवरील अप मार्गावरील वाहतूक म्हणजेच ठाण्याला जाणारी पनवेल, बेलापूर येथील वाहतूक 10.12 ते 3.53 या वेळेत तर ठाण्याहून पनवेलला जाणारी रेल्वेसेवा 11.14 ते 3.20 या वेळेत बंद राहील.

मुंबईमध्ये रेल्वेच्या रूळ, ओव्हर हेड वायर्स यांच्या डागडुजीच्या कामासाठी विकेंडला मेगाब्लॉक घेतला जातो. दर रविवारी विशिष्ट भागांमध्ये मेगाब्लॉक घेऊन काम पूर्ण केले जाते.