Mumbai Rains: मुंबई शहर, उपनगरासह नवी मुंबईत जोरदार पाऊस; सखल भागात पाणीच पाणी
Mumbai Rains | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई सह नवी मुंबई मध्ये आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीजेच्या कडकडाटासह सकाळपासून पाऊस कोसळत असल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. तर सखल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल देखील रखडली आहे. यामध्ये मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरची सेवा विस्कळीत झाली आहे. अचानक बसरलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मुंबई,नवी मुंबई मध्ये पावसाचा धुमाकूळ, ट्रान्स हार्बर रेल्वे ठप्प तर मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने!

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलबुल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहेत. यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईमध्ये परळ, दादर, सायन सह नवी मुंबईत रबाळे, घणसोली या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

मुंबई मधील पावसाचा धुमाकुळ

मालड मधील दृश्य

ठाण्यातही पाऊस

परळमध्येही पाऊस

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ऐन नोव्हेंबर महिन्यात पाऊस कोसळल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे.