(Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांचे जनजीवन सध्या तुफान पावसामुळे विस्कळीत झाले आहे. आज मुंबई (Mumbai) आणि जवळपासच्या परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे लोक हैराण झाली होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या वडाळा (Wadala) येथील गगनचुंबी इमारतीचा आहे. या बिल्डिंगवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे ही इमारत धबधब्यासारखी दिसत होती. हा व्हिडिओ के सुदर्शन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एकीकडे संपूर्ण मुंबई शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना कफ परेडच्या या इमारतीला अक्षरश: धबधब्याचं स्वरुप आलं आहे. (Rainfall In Mumbai City : कुर्ला परिसरात पूरस्थिती, तेराशे नागरिकांचे स्थलांतर; NDRF जवानांकडून सावधगिरीचा उपाय)

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एखाद्या पर्यटनस्थळी धबधब्यावरुन जसं पाणी कोसळतं त्याप्रमाणे इमारतीवरुन पाणी कोसळत आहे, हे दृश्य पाहून असेच वाटते. लोकांनी व्हिडिओवर विविध टिप्पण्या करण्यास सुरवात केली. बर्‍याच जणांनी असा प्रश्न केला की हे पावसामुळे झाले आहे काय?

Cuffe Parade, कफ परेड, Mumbai Rains, महाराष्ट्र, मुंबई, Cuffe Parade Skyscraper,

हे कफ परेड आहे आणि हे कसे शक्य आहे ???

पुढची ट्रिप आता लोणावाला नाही इथे होणार...

चीनला विसर मुंबईकडे आता स्वतःची धबधबा इमारत आहे

दरम्यान, सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. शिवाय, पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे, या इमारतीचे मालक लोढा समूहाने नंतर लोकांसमोर वास्तविकता उघड केली आणि सांगितले की, पाणी साठवण्यासाठी इमारतीत टाकी बसविण्यात येत होती. परंतु चाचणीदरम्यान गडबड झाली आणि , पाणी ओसंडू लागले. ज्यामुळे इमारतीत असे दृश्य दिसले.