Thane Rain (Photo Credit- X/ANI)

Maharashtra Rainfall Forecast: आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai Rains) आणि त्याच्या शेजारील उपनगरांमध्ये, ठाणे (Thane Weather) आणि नवी मुंबईसह, (Navi Mumbai Rainfall) बुधवारी (28 मे) मुसळधार पावसाने (Heavy Rain Warning) हजेरी लावली. ज्यामुळे अनेक भागात दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC), 28 मेसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert Mumbai) जारी केला आहे. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC ) पिवळा इशारा जारी केला आहे. आरएमसीने दिलेल्या माहितीनुसार, "अनेक ठिकाणी विजांसह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे."

हवामान खात्याचा अंदाज : वीजांसह पाऊस आणि जोरदार वारे

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. खास करुन बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरात पावसामुळे पाणी साचल्याचे वृत्त असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा, Sinhagad Fort: पर्यटकांनो लक्ष द्या! पुण्याजवळील सिंहगड किल्ला 29 मे रोजी बंद; पावसाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक करणार परिसराची तपासणी)

तापमानाचा अंदाज : कमाल 34 अंश, किमान 29 अंश

मुंबईतील हवामानानुसार, 28 मे रोजी कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Lightning Safety Tips: पावसाळ्यात कडाडणार्‍या वीजांबददल काही मिथकं आणि सत्य यांच्याबद्दल भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा; पहा कसे रहाल सुरक्षित?)

ठाणे आणि नवी मुंबईत गडगडाटी वादळाची शक्यता

भारतीय हवामान खात्याचे माजी शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली की, “28 मे रोजी दुपारी 2:30 वाजता ठाणे आणि नवी मुंबई भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचे मेघगट पाहण्यात आले. हे वादळी ढग मुंबईच्या पूर्व उपनगरांजवळ आहेत. सुमारे 7 किमी उंचीच्या ढगांमुळे मुसळधार पावसासह गडगडाटी वादळाची शक्यता आहे. MMR, KDMC, नवी मुंबई आणि ठाणे भागात सतर्क राहा.”

किनारपट्टी आणि घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट

RMC मुंबईनुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी आणि घाटमाथ्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा घाट भाग, तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये वीजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ठाण्यात बरसरणारा तुफान पाऊस

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये पावसासह वीज आणि झंझावाती वारे होण्याची शक्यता आहे.

मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, समुद्रात न जाण्याचा सल्ला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हवामान अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट, गडगडाटी वादळ आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. महानगरपालिकेने याशिवाय सुमारे 4.88 मीटर उंचीच्या भरतीसाठी इशारा दिला आहे आणि मच्छिमारांना त्या वेळी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.