
Mumbai Monsoon 2025: भारतीय हवामान खात्याने (IMD Alert) महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Weather) वाढण्याचा इशारा दिला असून, 9 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai Rain Update), ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पालघरसाठी रेड अलर्ट जारी
मध्यप्रदेश व परिसरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या परिसंस्थेमुळे, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिलेल्या निवेदनुसार, पर्जन्यप्रवण भागांमध्ये वीज चमकण्याची शक्यता, वादळासह वारे 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. रविवारी हवामान विभागाने ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला. मुंबई शहरात मध्यम पाऊस तर उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली.
मुंबईमध्ये आकाश ढगाळ, जोरदार पावसाची शक्यता
मुंबईसाठी पुढील 24 तासांचा अंदाज असा आहे की, आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत अत्यंत जोरदार पाऊस आणि 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने झोडपणारे वारे अनुभवायला मिळू शकतात. मुंबईत कमाल तापमान 31°C आणि किमान तापमान 25°C राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत हंगामी पावसाच्या एकूण 26.81% पावसाची नोंद
जूनच्या मध्यापासून मुंबईत पावसाची तीव्रता वाढली असून, यावर्षीने सरासरी जूनमधील पावसाची मर्यादा पार केली आहे. आतापर्यंत कुलाबा वेधशाळेत 684 mm आणि सांताक्रूझ वेधशाळेत 649 mm पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ही आकडेवारी अनुक्रमे 558 mm आणि 443 mm होती. यंदा मुंबईने हंगामी पावसाच्या एकूण 26.81% पावसाची नोंद केली आहे.
मुंबईला पाणीपुरवाठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठी वाढला
मुख्य शहरासोबतच पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या कॅचमेंट भागांमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलावांतील साठा 60% च्या जवळपास पोहोचला आहे. 6 जुलैच्या सकाळपर्यंत सात तलावांतील एकूण जलसाठा 59.56% इतका झाला असून, हा साठा 2024 मध्ये 10.88% आणि 2023 मध्ये 18.29% इतका होता.
मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलावांची एकूण साठवण क्षमता – 1447363 मिलियन लिटर
6 जुलैच्या सकाळपर्यंत सात तलावांतील जलस्तर:
- अप्पर वैतरणा – 71.50%
- मोडक सागर – 75.46%
- तानसा – 60.43%
- मध्य वैतरणा – 71.66%
- भातसा – 50.19%
- विहार – 45.62%
- – 44.43%
पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पूरप्रवण भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.