Mumbai Rain Update: मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई मध्ये पुढील 24 तास अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसतील- IMD चा अंदाज
Mumbai Rains (Photo Credits-ANI)

गेल्या दोन दिवसांपासून दमदार कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळ पासून विश्रांती घेतली आहे. मात्र पुढील 24 तासांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) येथे अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 40-70mm इतक्या पावसाची नोंद झाली. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

जुलैमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने मुंबईकरांची पार दैना केली. त्यानंतर 10-11 ऑगस्ट पासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला. मुंबईला पाठीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मुंबईतील पाणी कपात 20% वरुन 10% करण्यात आली आहे. (Mumbai Water Cut: मुंबई तलावक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने 21 ऑगस्टपासून 10% पाणीकपात; 85% जलसाठा उपलब्ध)

K S Hosalikar Tweet:

दरम्यान गुजरातवर ढग दाटून आले असून ते पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान मधील काही भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.