मुंबईसह (Mumbai) राज्यभरात आजपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाच्या हजेरीमुळे लोकलसह रस्त्यांवरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मात्र पहिल्याच पावसात दादर आणि गोरेगाव येथे दुर्घटना घडली आहे.
दादर (Dadar) येथील फुल मार्केट जवळील भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये भिंत कोसळल्याने तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम मधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच गोरेगाव येथे तीन जणांना विजेचा धक्का लागून तीन जणांचा धक्का लागल्याची दुर्घटना घडली आहे.(Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईमधील अनेक बस मार्गांमध्ये बदल)
या दमदार पावसाचा फटका नागरिकांना बसला असून त्यांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भिवंडी – ठाणे रोडवरील राहनाळ येथे होली मेरी शाळेच्या समोरील उघड्या गटारात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थिनी आणि तिची आई पडली. परंतु सुदैवाने नागरिकांनी दोघींनाही बाहेर काढल्याने अनर्थ टळला आहे.