प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज (9मे) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे राज्य वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागणार असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्यातर्फे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 55/600 आणि 88/00 ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तर जड सामान आणि मालवाहतूक घेऊन जाणारी वाहने द्रुतगती मार्गावरील 85/500 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत.(मुंबई: कुर्ला भागामधील कुरेशी नगरमध्ये दुर्घटना; 'पठाण चाळ' चा भाग कोसळून एकाचा मृत्यू, एकजण जखमी)

तर चारचाकी आणि अन्य वाहाने येथील मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (MH4) कडून मुंबईच्या दिशेला वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.