Mumbai Pune Expressway Bus Accident: मुंबई पुणे महामार्गावर बस धडकल्याने  भीषण अपघात, 2 जण ठार, 20 जण जखमी
(Photo Credits: Twitter/ANI)

मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway) रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूर (Khalapur) जवळ दोन प्रवाशी बस एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास मिनी बस आणि व्होल्वो या दोन बसची टक्कर झाल्याने हा अपघात झाला, ही धडक इतकी तीव्र होती की त्यात 2 जणांचा जागच्या जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे याशिवाय 20 जण गंभीर जखमी झाली आहेत.

लोकसत्ताच्या माहितीनुसार खालापुर हद्दीत माडप ब्रिजजवळ पुण्या कडे जाणा-या मार्गावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतेय. अपघातातील एक बस महाबळेश्वर येथे सहलीसाठी जात होती. वसईहून महाबळेश्वरला सहलीसाठी जाणारे 20 जण या बसमध्ये होते. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

ANI ट्विट 

प्रसंगाची माहिती कळताच स्थानिकांनी तिथे धाव घेऊन तात्काळ पोलिसांना बोलावून घेतते, त्यानंतर काहीच वेळात पोलिसांच्या व बचाव पथकांनी घटना स्थळी दाखल होऊन बचावकार्याला सुरवात केली आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त अद्याप हाती आले नाही.