Mumbai Pune Expressway Traffic Update: विकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांनी अनेकांचे व्हेकेशन प्लॅन्स; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक मंद गतीने

आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती आणि ईस्टर संडे या महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्या शनिवार, रविवारला जोडून आल्याने काहींनी शॉर्ट ट्रीप प्लॅन केली आहे तर काहींनी प्रार्थनास्थळांना भेट देण्यासाठी गर्दी केली आहे.

Close
Search

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Mumbai Pune Expressway Traffic Update: विकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांनी अनेकांचे व्हेकेशन प्लॅन्स; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक मंद गतीने
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

14 ते 17 एप्रिल लॉंग विकेंड असल्याने अनेक जणांनी हॉलिडे वर जाण्यासाठी जवळच्या पर्यटनस्थळांची निवड केली आहे. आजपासून या लॉंग विकेंडला (Long Weekend) सुरूवात होत असल्याने मुंबई-पुण द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) सकाळपासूनच वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. त्यामुळे ट्राफिक पोलिसांची देखील वाहतूक सुरळित राखण्यासाठी धडपड सुरू आहे.

आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती आणि ईस्टर संडे या महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्या शनिवार, रविवारला जोडून आल्याने काहींनी शॉर्ट ट्रीप प्लॅन केली आहे तर काहींनी प्रार्थनास्थळांना भेट देण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली आहे. परिणामी मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून खालापूर टोल नाका ते लोणावळा एक्झिट दरम्यान वाहतूक संथ गतीने पुढे सरकत आहे. हे देखील नक्की वाचा: April 2022 Holiday Calendar With Major Indian Festivals and Events: चैत्र नवरात्री, रमजान, गुड फ्रायडे; एप्रिल महिन्याच्या सर्व महत्त्वाच्या तारखा आणि बँक सुट्ट्यांची यादी, पाहा .

पहा मुंबई-पुणे महामार्गावरील स्थिती

सध्या महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वीच्या परीक्षा उरकल्या आहेत. शाळांनाही सुट्ट्या लागलेल्या असल्याने कोविड नंतर सर्वत्र निर्बंधमुक्त वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी बाहेर पडून सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा प्लॅन केला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change