मुंबई-पुणे एक्सप्रेवर (Mumbai Pune Expressway) खंडाळा घाटा (Khandala Ghat) मध्ये बोगद्याजवळ एक जड कंटेनर पलटी झाल्याने पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या कंटेनर हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातानंतर हलकी वाहनं जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सुरू ठेवली आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्यांनी लोणावळा मध्ये वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. हा अपघात आज (2 ऑगस्ट) दिवशी सकाळी अकरा, सव्वा अकराच्या सुमारास झाला आहे. अपघात झालेल्या कंटेनरला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. नक्की वाचा: Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील विचित्र अपघातात दोन ट्रक जळून खाक .
मागील आठवड्यात पावसाच्या दिवसात जोरदार सरींसोबत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरडी कोसळण्याचं सत्र सुरू होतं. त्यावेळी प्रशासनाने दिवसा ब्लॉक घेत या दरडी हटवून प्रवास सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता.