Road Accident | PC: Twitter/ANI

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर एका वर्‍हाडींच्या बसला अपघात झाला आहे. पुणे-मुंबईच्या लेनवर हा भीषण झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान 10 जण जखमी आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही बस सिंधुदुर्ग मधून कोल्हापूर मार्गे वाशिंदला परत जात असताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिली. नक्की वाचा: Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे हायवे वर 3 ट्रकचा अपघात; एक कंटेनर 100 फूट दरीत कोसळला .

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने बसला दिलेल्या धडकेत बसच्या मागील भागाचा चुराडा झाला आहे. तर कंटेनरचेही नुकसान झाले आहे. या बस मध्ये 35 प्रवासी होते. दरम्यान अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे.

पहा ट्वीट

खाजगी बस आणि कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात एक्सप्रेसवे वरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. खंडाळा, रायगड महामार्ग पोलिसांकडून या अपघातानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेऊन अन्य वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.