Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे हायवे वर 3 ट्रकचा अपघात; एक कंटेनर 100 फूट दरीत कोसळला
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai Pune Highway)  वर बोरघाटामध्ये (Borghat)  भीषण अपघातात 3 ट्रकचे नुकसान झाले आहे. या अपघातात एक कंटेनर ट्रक 100 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान 3 ट्रकची एकमेकांना धडक बसल्याने हा प्रकार घडला आहे. दरीत कोसळलेल्या ट्रकच्या कॅबिनमधून चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या मध्ये कोणत्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही.

आज (30 नोव्हेंबर) च्या सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात हा अपघात झाला आहे. मुंबईकडे येणार्‍या मार्गावर पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. ढेकू गावाजवळ झालेल्या अपघात 3 ट्रक एकमेकांना आपटल्यानंतर एक ट्रेलर 100 फूट खोल दरीत कोसळला. दुसऱ्या ट्रकची केबिन या ट्रेलरपाठोपाठ दरीत कोसळली. आणि तिसरा ट्रक रस्त्यातच पलटी झाला आहे. नक्की वाचा: Lavni Artist Meena Deshmukh Dies: ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा मीना देशमुख यांचं अपघाती निधन .

मुंबईकडे येणार्‍या मार्गावर उतारावर हा अपघात झाला आहे. सध्या दरीत कोसळलेल्या कंटेनर मधील चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ट्रकच्या केबिन मधील चालक बाहेर काढण्यात आला आहे. अपघात झाल्याचं समजताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींना नजिकच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. पहाटे झालेल्या अपघातामध्ये मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे.