Accident | File Image

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे (Mumbai- Pune Express Way) वर शनिवारी 14 , डिसेंबर रोजी एक भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजत आहे. डी.वाय.पाटील (D.Y. Patil College) लोहगाव चे काही विद्यार्थी लोणावळा (Lonavala)  येथे पिकनिक साठी जात असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून यांची नावे हर्ष वर्धनता, पार्थ गोगिया , नितिन सिंग चौधरी, अनिशा जैन वय, ब्रिजल पालेजा, आदित्य सिंग अशी आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Fastag 'या' ठिकाणी दिला जात आहे फ्री, आजच घ्या नाहीतर दुप्पट टोल भरावा लागेल)

प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे मोटारीने लोणावळ्याला फिरण्यासाठी जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असलेल्या कार वरील नियंत्रण सुटलेसुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये कार द्रुतगति मार्गावर लावण्यात आलेल्या पत्र्याच्या सुरक्षा कठड्यावर जोरात आदल्याच समजत आहे. मोटारीत चार मुले आणि दोन मुली होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा अपघात प्रवण परिसर म्हणून सिद्ध होत आहे, वाहनांच्या वेगावर मर्यादा आणूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्यचे अलीकडेच दिसून आले होते.‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीन्वये गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या अपघातांमध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात एक्स्प्रेस वेवर केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे झाले आहेत.