मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने पुढे असलेल्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चुराडा झाला असून चालक गंभीर जखमी झाला.
कारच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अन्य कोणीही नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अपघात झाल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या रेलिंगला जाऊन जोरात धडकली. त्यानंतर या घटनेची तातडीने माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले असून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; टँकर आणि Swift च्या धडकेत 4 जण ठार)
यापूर्वी सुद्धा लोणावळा येथे पिकनिकसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच मुंबईतील वाकोला पूलावरुन जाणाऱ्या एका बाईकस्वाराला रिक्षाची जोरदार धडक लागल्याने 25 फूट खाली कोसळल्याची घटना घडली होती. या मध्ये बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला होता.