Mumbai-Pune Expressway- मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच ठार, पाच जखमी
Mumbai - Pune Expressway Accident | (Photo Credits: Twitter/ ANI)

मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर (Mumbai - Pune Expressway) आज भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारला बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात (Mumbai - Pune Expressway Accident) घडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचावर कार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना अष्टविनायक (पनवेल) व अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतरांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताबाबत माहिती अशी की, पुण्याहून मुंबईला निघालेल्या कारला पाठिमागून धडक बसली. धक्कादायक म्हणजे एका कंटेनरने ट्रक, टेम्पो आणि पुढे असलेल्या दोन कारना पाठिमागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात जबर मार लागल्याे झुंझारे कुटुंबीयांतील सदस्यांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नवी मुंबई येथे राहणारे होते.

मृतांमध्ये मंजू प्रकाश नाहर (58), डॉ. वैभव वसंत झुंझारे (41), उषा वसंत झुंझारे (63, वैशाली वैभव झुंझारे (38), श्रिया वैभव झुंझारे (5) यांचा समावेश आहे. तर, स्वप्नील सोनाजी कांबळे (30) , प्रकाश हेमराज नाहर (65), अर्णव वैभव झुंझारे (11), किशन चौधरी (गंभीर जखमी), काळूराम जमनाजी जाट गंभीर जखमी झाले आहेत. (हेही वाचा, Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; अपघातात 13 जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी)

प्राप्त माहितीनुसार, कंटेनर (RJ. 51.GB.2238), (इनोव्हा Mh.12. LX. 4599), क्रेटा (Mh. 47.AD.4025), टेम्पो (MH. 14.GD.3880), ट्रक (MH. 14.P.6870) आदी वाहनांचा अपघात झाला.