Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; अपघातात 13 जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी

या अपघातात 13 जण जागीच मरण पावले, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; अपघातात 13 जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी
Andhra Pradesh Accident (PC - ANi)

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 13 जणांवर काळाने घाला केला. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जण जागीच मरण पावले, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात जास्त वेगामुळे झाला आहे की, त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध सुरू आहे.

वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील वल्दुरती मंडळाच्या (Veldurti Mandal) मदारपूर गावाजवळ बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. त्यामध्ये 13 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये 8 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या 4 जणांना जवळच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वाचा - Accident: लग्नासाठी जात असताना रस्त्यातच गाडीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी)

दरम्यान, शुक्रवारी आंध्र प्रदेशातील विशाखारट्टनम जिल्ह्यातील अरकू जवळ अनंतगिरी येथे एक भीषण अपघात झाला होता. 20 प्रवाशांची बस खाईत कोसळल्याने 4 जण ठार झाले होते. तर सुमारे 13 लोक जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताचं घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, पोलिस वैद्यकीय कर्मचारी आणि राज्य अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले.

(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2021 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).