गेल्या पस्तीस तासापासून जाम झालेला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Express Way) अखेर मोकळा करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. बोरघाटामधील (Borghat) वाहतूक कोंडी फोडण्यास रायगड पोलिसांना (Raigad Police) यश आले आहे. रायगड महामार्ग पोलिसांकडून मुंबईहून पुण्याला येणारी लेन आणि पुण्याहून मुंबईला जाणारी लेन या दोन्हीही लेनवर मुंबई कडून येणारी वाहतूक सुरू केल्याने बोरघाटातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली आहे. सलग सुट्ट्या आल्याने मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. (हेही वाचा -Mumbai Pune Expressway Traffic Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वर वाहनांची लांबच लांब रांग)
मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी रात्री तर 10 ते 12 किमीचा रांगा लागल्या होत्या. त्यात महामर्गावर अनेक वाहने बंद पडल्याने मोठ्या.वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागला. वाहतूक कोंडी झाल्यानं रात्रभर महामार्ग जाम झाला होता. मात्र रायगड महामार्ग पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना त्यांना यश आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे.
सलग सुट्या असल्याने अनेकजण आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर पडले मात्र, त्यांना द्रुतगती महामार्गावर तासनतास अडकून बसावे लागले. त्यामुळे मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. ज्यांच्यासोबत लहान मुले आहेत त्यांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले.