मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज 11 ते 2 या वेळेत बंद राहणार; असा असेल पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway (Photo Credits-Facebook)

मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune Expressway) महामार्गावर तांत्रिक कामानिमित्त आज सकाळा 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही लेन बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील कामशेत बोगदा येथे 'स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम' बसविण्यात येणार असल्या कारणाने या मार्गावरील लेन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज 11 ते 2 दरम्यान या मार्गावरील तिस-या लेनवरील वाहतूक ही संथ गतीने सुरु राहणार आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, प्रादेशिक विभाग पुणे यांच्यावतीने यांच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांनी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर 71 किमीचा कामशेत बोगद्यात सकाळी 11 ते 2 या वेळेत ‘स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर; 'तुतारी एक्सप्रेस' ला जोडले जाणार आता 4 अतिरिक्त डब्बे

शिवाय या कामामुळे द्रुतगती मार्गावरील या कालावधीत पहिली व दुसरी लेन बंद ठेवण्यात येणार असून, तिसऱ्या लेनवरून वाहतूक संथ गतीने सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

असा असेल पर्यायी मार्ग:

या मार्गावरील दुरुस्तीदम्यान वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे पुलावरून जुना-मुंबई महामार्ग (NH-4) मार्गे मुंबईकडे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे 11 ते 2 या वेळेत पुण्याकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी व प्रवाशांनी कामशेत बोगद्यादरम्यान कमी वेगाने वाहने चालवून महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.