मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत राहणार बंद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) आज  दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या वेळेत दोन्ही मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. परंदवाडी येथे महावितरणाची केबल टाकण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने दर दिवसा कामानिमित्त प्रवास करणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही दुपारची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

या ठिकाणी महावितरणाची असलेली हायटेंशन केबल तुटल्याने ती पुन्हा जोडण्यासाठी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतुक वळवण्यात आली आहे. परंदवाडी या ठिकाणाहून अर्धा किमीवर सर्व अवजड वाहने, मालवाहतूक वाहने थांबवण्यात येणार आहेत.

हेही वाचा- उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे दुपारी 1 वाजता बंद राहणार

तसेच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी आणि प्रवासी वाहनांसाठी किवले पुलाच्या येथून जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर पुण्याच्या येथून येणारी हलकी आणि चारचाकी वहाने उर्से टोलनाका येथून पुणे-मुंबई मार्गावर वळवण्यात आली आहेत.