मुंबई-पुणे (Mumbai-Pune) महामार्गावर आता नव्या 8 शिवनेरी बसची (Shivneri Bus) सोय करण्यात आली आहे. या नव्या बसची सोय आजपासून करण्यात आली असून मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 32 वेळा या बसच्या फेऱ्या होणार आहेत. यापूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवनेरी बसच्या तिकिटात कपात केली होती.
शिवनेरीची बससेच्या माध्यमातून आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता या सारखी उत्तम सोय करुन देते. सध्या मुंबई-पुणे दरम्यान शिवनेरीच्या 272 फेऱ्या सुरु आहेत. त्यात आता अधिक 32 फेऱ्यांची वाढ होणार आहे. यामुळे आता एकूण 304 फेऱ्या नियमित होणार आहेत.(खुशखबर! 'शिवनेरी' बसच्या दरात भरघोस कपात; 8 जुलैपासून लागू होणार नवे दर)
या फेऱ्या दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट आणि ठाणे-स्वारगेट या मार्गांवरुन धावणार आहेत. तसेच शिवनेरी बसने केलेल्या तिकिट दराच्या कपातीमुळे 21 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे.