काँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'जय महाराष्ट्र' म्हणत बांधले शिवबंधन
प्रियंका चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य-ANI)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या माजी प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पक्ष सोडला आहे. त्यानंतर आता शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आज (19 एप्रिल) प्रवेश केला. तर उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे.

प्रियंका गांधी यांनी शिवसेनेत प्रवेश करताना महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेस पक्षात असताना सहन कराव्या लागलेल्या मनस्ताप व्यक्त करताना प्रियंका चतुर्वेदी भावुक झाल्या होता. तसेच कोणत्या मुद्दांच्या आधारावर आणि कोणत्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या याच्या पूर्ण विचार करत मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.(हेही वाचा-काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी सोडला पक्ष, शिवसेनेत प्रवेश करणार)

तसेच आता यापुढे शिवसेनेच्या प्रचारासाठी काम करणार असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. मात्र काँग्रेस पक्षात गेली 10 वर्षे काम केल्याने उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्याचसोबत पक्षासाठी निस्वार्थीपणाने काम केले त्याची पक्षाने जाणीव ठेवली नाही. उलट माझ्यासोबत गैरव्यवहार करण्यात आले असल्याची भावना प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.