राज्यात तुरडाळीचे भाव शंभरी पार, सामान्य नागरिकांना बसणार फटका
Food Grains (Photo Credits-Facebook)

राज्यात सध्या तुरडाळीचे भाव काही दिवसांपासून वाढत चालले असून आता त्यांनी शंभरी गाठली आहे. या डाळींच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. त्याचसोबत मूग, चवळी, उडीद, हरभारा यांचेसुद्धा दर वाढवण्यात आले आहेत.

ऐन पावसाळ्यात डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने त्यांचे दर वाढवण्यात आले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. जास्त करुन ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणासाठी खिचडी हा प्रकार बनवला जातो. मात्र आता डाळीचे भाव वाढल्याने तुरडाळीची खिचडी जेवणातून वगळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी तर डाळींचे स्थानिक उत्पादनात घट झाली आहे.(महागाईचा भडका उडणार, तूरडाळ 100 रुपये किलो)

राज्यात डाळींचे वाढलेले भाव पुढीलप्रमाणे:

>तूरडाळ: 95 ते 100 रुपये प्रतिकिलो

>मठडाळ: 90 ते 95 रुपये प्रतिकिलो

>चवळी: 80 ते 85 रुपये प्रतिकिलो

>मूगडाळ: 90 ते 95 रुपये प्रतिकिलो

>हरभराडाळ: 85 ls 90 रुपये प्रतिकिलो

>मसूरडाळ: 80 ते 85 रुपये प्रतिकिलो

>उडीदडाळ: 70 ते 75 रुपये प्रतिकिलो

डाळींचे उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांना काही वेळेस अन्य राज्यांतून मालाची आयात करावी लागते. त्याचसोबत आयात केलेल्या डाळीसाठी वाहतूक खर्च यांच्यासह अन्य गोष्टी लक्षात घेऊन डाळीचे दर ठरविले जातात. त्यानंतर स्वस्त धान्याच्या दुकानात या डाळी विक्रीसाठी पाठवल्या जातात. परंतु वाढलेल्या डाळींच्या किंमतीमुळे ग्राहकसुद्धा त्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.