Mumbai: मालवणी येथे भाचीवर अत्याचार करणाऱ्या गर्भवती महिलेला अटक
Arrest (Photo Credits: File Image)

Mumbai: मालवणी पोलिसांनी एका 26 वर्षीय गर्भवती महिलेला अटक केली आहे. आरोपीने आपल्या 9 वर्षाच्या भाचीला कथित त्रास देण्यासह तिला शिक्षा म्हणून इस्रीचे चटके दिले. पोलिसांनी असे सांगितले की, मुलीच्या अंगावर भाजल्याच्या काही जखमा सुद्धा दिसून आल्या आहेत.(Mumbai Cyber Crime: मुंबईतील एका 62 वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक, अज्ञाताने 1.55 लाख रुपयांचा घातला गंडा)

पीडितेने स्थानिकांची मदत घेत स्वत:चा तिने बचाव केला. सदर महिलेला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा स्थानिकांनी मारहाण केली तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. साफिया अब्दुल हमिद शेख असे आरोपीचे नाव आहे. पीडितेला तिच्या आईने महिला गर्भवती असल्याने तिची मदत करण्यासाठी तिच्याकडे पाठवले होते.(Mumbai Crime: भांडूपमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक, भांडुप पोलिसांनी घेतलं ताब्यात)

शुक्रवारी मुलीला किराणामाल आणण्यासाठी पाठवले. त्याचवेळी तिने बाजूला महिलेला तिची मदत करण्यास सांगितले. सुरुवातीला पीडिता रुडू लागली आणि तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने याबद्दल पोलिसांना कळवण्यात आले असे स्थानिकांनी सांगितले. आरोपी साफिया हिला केली आहे. तर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.