Image For Representation Building Collapsed (Photo Credits-Twitter)

दक्षिण मुंबई (South Mumbai)  मधील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) परिसरात युसूफ बिल्डिंग (Yusuf Building) चा एक भाग कोसळला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 ते 5  जण अडकल्या चे वृत्त सध्या समोर येत आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या साथ पथकातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत यापैकी दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात या जवानांना यश समजत आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथील युसूफ बिल्डिंग ही तळमजला अधिक चार मजली इमारत आहे. आज रात्री सव्वा नऊच्या सुमारास इमारतीच्या वरच्या बाजूचा काही भाग कोसळला. यामुळे साहजिकच आजूबाजूच्या परिसरात गोंधळ होऊ लागला तरीही काही स्थानिकांनी तात्काळ इमारतीच्या कोसळलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. काही वेळातच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या आणि त्यांची बचावकार्यात प्रयत्न सुरु केले.

ANI ट्विट

दरम्यान, खबरदारीचा पर्याय म्हणून युसूफ बिल्डिंग आणि तिच्या शेजारच्या द्वारकादास इमारतीला खाली करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे. संबंधित इमारत ही ही म्हाडाची उपकर प्राप्त वास्तू आहे, त्यामुळे सध्या जरी जीवितहानी टळली असली तरी अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे म्हंटले जात आहे.