मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वरळी पोलीस (Worli Police) ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक अजय मते (Ajay Mate) आणि पोलीस शिपाई अजय गवांदे (Ajay Gawande) या दोघांनी वरळी सी फेस येथे समुद्रात बुडणाऱ्या वयोवृद्धाचे प्राण वाचवल्याचे समजत आहे. यानंंतर महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंनी या दोन्ही साहसी पोलिसांचे कौतुक करत या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. वरळी पोलीस ठाण्याच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि साहस वाखाणण्याजोगे आहे असे म्हणत अनिल देशमुख यांंनी पोलिसांच्या हिमंंतीचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटर वर अनेकांंचे लक्ष वेधुन घेत आहे, अनेकांंनी पोलिसांंचे कौतुक करत या व्हिडिओखाली कमेंटस केल्या आहेत. Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता
अद्याप तरी या व्हिडिओ मधील वृद्ध इसमाची ओळख पटलेली नाही मात्र ही घटना 28 ऑगस्ट संंध्याकाळची असल्याचे समजत आहे.वाढता पाऊस आणि समुद्रात उसळणार्या लाटा अशा परिस्थितीत समुद्राजवळील कंंट्रोल रुम ला सतर्क राहण्याच्या सुचना होत्या. अशावेळी संध्याकाळी हा इसम समुद्रात बुडत असल्याची माहिती मिळाली आणि या दोन पोलिसांंनी त्वरित घटना स्थळी जाउन या वृद्ध व्यक्तीला वाचवले.
अनिल देशमुख ट्विट
मुंबई पोलीस (@MumbaiPolice) दलातील वरळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक अजय मते आणि पोलीस शिपाई अजय गवांदे या दोघांनी वरळी सी फेस येथे समुद्रात बुडणाऱ्या वयोवृद्धाचे प्राण वाचविले. वरळी पोलीस ठाण्याच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि साहस वाखाणण्याजोगे आहे. pic.twitter.com/4HDDPe09Ry
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 29, 2020
दरम्यान, यापुर्वी सुद्धा मुंंबई पोलिसांनी अनेक अशा प्रसंगी नागरिकांना वाचवल्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. मागील काही दिवसात मुंंबई व लगतच्या भागात पावसाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांंनी समुद्राजवळ जाऊ नये असेही आवाहन याआधी करण्यात आले आहे.