Mumbai Police Rescues Snake: सापाला लीलया रेस्क्यू करणाऱ्या मुंबई पोलिसाची अनोखी कामगिरी; पहा Video
Mumbai Police Rescue Snake (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांची (Mumbai Police) ख्याती मोठी आहे. ही ख्याती मिळवण्यासाठी पोलिसांचे अविरत परिश्रम, जीवाची बाजी लावून काम करणयाची प्रवृत्ती, कर्तव्यापलिकडे जात केलेली जनसेवा या गोष्टी कारणीभूत आहेत. कोरोना व्हायरस संकटकाळात पोलिसांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र केलेले काम आणि कर्तव्यापलिकडे जात जनतेची केलेली सेवा आपण अनुभवली आहे. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतही पोलिसांचे कार्य सुरुच आहेच. दरम्यान, मुंबई पोलिसांचा एक अनोखा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत पोलिस चक्क नाग रेक्स्यू करताना दिसत आहेत. मुरलीधर जाधव असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Mumbai Police: मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, स्व:ताचे आयुष्य संपावायला निघालेल्या एका तरूणीचा वाचवला जीव)

अंधेरी (Andheri) परिसरातील गौतम निवास (Gautam Nivas) सोसायटीमध्ये नाग शिरला होता. कुर्ला पोलिस कंट्रोल रुमच्या आदेशानुसार या सापाला रेस्क्यू करण्याची जबाबदारी मुरलीधर जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि त्यांनी ती अगदी लीलया पार पाडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडिओ:

यावरुन पोलिसांचे अनोखे काम अधोरेखित होते. पोलिसांच्या या कामानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. कमेंट्सद्वारे नेटकरी पोलिसांना सलाम ठोकत आहेत. यापूर्वी देखील पोलिसांनी अशी विविधढंगी काम करत जनतेची सेवा केली आहे.