मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा (Chhota Shakeel) म्होरक्या रियाज भाटी (Riyaz Bhati) विरूद्ध जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. रियाजने साक्षीदाराला धमकी दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशन मध्ये रियाज विरूद्ध एक एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये साक्षीदार असणार्याला रियाज भाटी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी जून 2022 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान धमक्या दिल्या की त्याने साक्ष देण्यासाठी कोर्टात जाऊ नये. गेल्यास रियाजच्या बाजूने बोलावं. जर असे केले नाही तर त्याला जीवे मारले जाईल.
रियाज भाटी विरूद्ध FIR दाखल
तक्रारदाराच्या माहितीनुसार, तो ज्या प्रकरणामध्ये साक्षीदार आहे त्यामध्ये रियाज भाटी वर आरोप आहेत की तो हनी ट्रॅप लावून पैसा उकळत होता. अशाच एका वसुलीच्या प्रयत्नामध्ये त्याच्या विरूद्ध IPC च्या 384 आणि पिटा अॅक्टच्या कलम 5 आणि 9 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा म्होरक्या आहे सोबतच छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटचा देखील अत्यंत जवळचा व्यक्ती आहे.
Mumbai Police has registered a case of extortion and death threats against Riyaz Bhati, a close associate of underworld don Chhota Shakeel. The complainant alleged that Riyaz Bhati and his close associate threatened him to not go to court to testify and if he went, he should…
— ANI (@ANI) November 20, 2023
आता पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारी नंतर रियाझ भाटी आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम 195(A), 506(2) आणि 34 अंतर्गत खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अंडरवर्ल्डशी निगडीत आहे. त्यामुळे याचा तपास क्राईम ब्रांच कसे दिला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, रियाज भाटी सध्या जेल मध्ये आहे आणि त्याने जेल मधून साक्षीदाराला धमकवण्यासाठी सूत्रं हलवली. रियाज भाटीचं नाव अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम सोबत जोडण्याची चर्चा यापूर्वी देखील झाली होती. मात्र नंतर त्याने छोटा शकील सोबत काम सुरू केले. भाटीने मात्र दाऊदचा साथीदार असल्याचा दावा फेटाळला होता.