Baba Siddique and his son Zeeshan Siddique (फोटो सौजन्य - फेसबुक)

Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) च्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी पनवेल, रायगडमध्ये छापे टाकून आणखी पाच आरोपींना अटक (Arrest) केली आहे. आता या प्रकरणात अटक केलेल्यांची एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अटक केलेल्यांवर कटात सामील असल्याचा आणि रसद पुरवल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेले लोक लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या संपर्कात होते. या आरोपींवर बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा आरोप आहे.

यापूर्वी अटक केलेल्या चार जणांमध्ये दोन नेमबाजांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला रात्री जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी)

बाबा सिद्दिकी आपल्या कारकडे जात असताना हल्लेखोरांनी अश्रुधुराचा वापर केला. यानंतर फरार आरोपी शिवकुमार गौतम याने 9 एमएम पिस्तुलातून सहा राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन आरोपींनी गोळीबार केला नसून त्यांच्याकडे पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे होती. (हेही वाचा - Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा)

बाबा सिद्दिकी यांचे सलमान खानसह अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत जवळचे संबंध होते. बाबा सिद्दीक्की यांना यापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तथापी, बाबा सिद्दीकीचा मुलगा, आमदार झीशान सिद्दिकी यांनी वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये, असं आवाहन केलं होतं. 'माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे संरक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझे कुटुंब तुटले आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. मला न्यायाची गरज आहे, माझ्या कुटुंबाला न्यायाची गरज आहे!', असं झीशान सिद्दीकीने आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.